पुणे, ता.१५ : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अंतरावली सराटी येथे १४ ऑक्टोबरला दुपारी मनोज जरांगे पाटील यांची मोठी सभा पार पडली. या सभेला राज्यभरातून आठ ते दहा लाख लोकांनी उपस्थिती लावली. गेल्या काही दिवसापासून या सभेची मोठी तयारी करण्यात आली होती. जरांगे पाटील यांच्या नेतुत्वाखाली सकल मराठा समाज येथे जमला होता.
यावेळी मनोज जरांगे पाटील बोलताना म्हणाले, ‘नजर पुरत नाही इतका लांब मराठा जमलाय. इतकी गर्दी जमली आहे. आता वर्ल्ड रेकॉर्डच झाला आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला. पुढे बोलताना म्हणाले, या सरकारने आता काय केलं माहित आहे का? माझं फेसबुक अकाऊंट बंद केलं आहे, असा गौप्यस्फोट जरांगे पाटील यांनी भर सभेत केला. यादरम्यान घडलेल्या घटनांवर राष्ट्रवादीचे नेते, कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत एक विधान केलं आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
अत्यंत पोटतिडकीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणाऱ्या मनोज जरांगे-पाटलांनी आज लाखोंचा समाज आरक्षणासाठी एक करून दाखवला. त्यांच्या या ऐतिहासिक सभेची दखल घेण्याऐवजी पेड ट्रोलर्सच्या माध्यमातून खोट्या तक्रारी करून जरांगे-पाटलांचे फेसबुक पेज बंद करणे, सभेच्या भागात नेटवर्क बंद करणे, आपल्या प्याद्यांच्या मार्फत जरांगे पाटलांवर आरोप करणे हे महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना शोभणारं नाही. काहीही करून आरक्षणाच्या मार्गात अडथळे आणण्यापेक्षा आपण सर्वजण सोबत आहोत हा विश्वास सरकारने मराठा समाजाला द्यावा, ही विनंती!
अत्यंत पोटतिडकीने #मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणाऱ्या मनोज जरांगे-पाटलांनी आज लाखोंचा समाज आरक्षणासाठी एक करून दाखवला. त्यांच्या या #ऐतिहासिक सभेची दखल घेण्याऐवजी पेड ट्रोलर्सच्या माध्यमातून खोट्या तक्रारी करून जरांगे-पाटलांचे Facebook पेज बंद करणे, सभेच्या भागात नेटवर्क बंद करणे,…
अत्यंत पोटतिडकीने #मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणाऱ्या मनोज जरांगे-पाटलांनी आज लाखोंचा समाज आरक्षणासाठी एक करून दाखवला. त्यांच्या या #ऐतिहासिक सभेची दखल घेण्याऐवजी पेड ट्रोलर्सच्या माध्यमातून खोट्या तक्रारी करून जरांगे-पाटलांचे Facebook पेज बंद करणे, सभेच्या भागात नेटवर्क बंद करणे,… pic.twitter.com/gP7v80VhGd
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 14, 2023