पुणे : गणपती बाप्पाच्या आगमनामुळे वातावरण कसं उत्साहित झालं आहे. भक्तगण बाप्पाच्या भक्तीत पार तल्लीन झाले आहे. जागोजागी रंगीबेरंगी डेकोरेशन, रोषणाई पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर AI (आर्टीफिशियल इंजेलिजन्स)तंत्रज्ञानाच्या मदतीने गणपती बाप्पाचे काही फोटो तयार करण्यात आले आहेत. स्कूल चले हम या थीमवर आधारीत हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत.
पावसाळा सुरू झाला की, बाप्पाच्या आगमनाचे भक्तांना वेध लागतात. बहुतांशवेळा पावसाळ्याच्या उत्तरार्धाच्या प्रारंभीच बाप्पाचे आगमन होत असते. यंदा गणरायाचे आगमन 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. बाप्पाचे सर्वात जल्लोषात आगमन होणार आहे. एआयद्वारे बनवण्यात आलेल्या गणपती बाप्पांच्या फोटोतून विद्या आणि विद्यालय दोन्हींची उजळण होत आहे.
शाळेतील विद्यार्थी अवतारात बाप्पांचे हे फोटो पाहायला मिळत असून शाळेत गप्पा मारताना, फळ्यावर धडे गिरवताना, जेवण करताना बाप्पांचे फोटो दिसून येत आहे. तसेच यातील काही फोटोमध्ये गणपती बाप्पा हातात पेन्सिल आणि वही घेऊन वर्गात शिक्षण घेत असतानाही दिसून येतात. तसेच, पाठीवर दफ्तर घेऊन शाळेत चालल्याचेही दिसून येत आहेत.