पुणे : बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. येत्या रविवारी म्हणजे ३१ मार्चला रविवार येत आहे, तरीदेखील बँका सुरु राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबतचे परिपत्रक काढले असून, रविवारीही बँका सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ३१ मार्चला रात्री उशीरापर्यंत कर्मचारी बँकांमध्ये काम करणार असल्याने १ एप्रिलच्या दिवशी सोमवारी सर्व बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय ‘आरबीआय’ने घेतला आहे. याबाबतची माहिती ‘आरबीआय’च्या परिपत्रकात देण्यात आली आहे.
आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असल्यामुळे बँका सुरु राहणार आहेत. ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळं वर्षाच्या शेवटच्या दिवशी बँकांना काम असणार आहे. त्यामुळेच ३१ मार्चला बँका सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ३१ मार्चला रात्री उशीरापर्यंत बँकांचे कामकाज चालणार आहे. मात्र, यादिवशी रात्री उशीरापर्यंत बँकांचे सार्वजनिक व्यवहार मात्र बंद असतील.
‘आरबीआय’ने निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्चला भारत सरकारशी संबंधित असणाऱ्याच सर्व बँका सुरु राहणार आहेत. या दिवशी सर्व बँका खुल्या असल्यामुळे वर्षातील आर्थिक व्यवहार सगळे पूर्ण होतील असे ‘आरबीआय’ने निवेदनात म्हटले आहे.
देशात १ एप्रिल ते ३१ मार्च असे आर्थिक वर्ष आहे. दरम्यान, मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच होळीचा सण आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या दिवशी बँका बंद राहणार आहेत. या आठवड्यात बँकांना कामकाज पूर्ण करण्यासाठी खूप कमी वेळ मिळत आहे. त्यामुळे रविवारी बँका सुरु राहणार आहेत. ३१ मार्चला रात्री उशीरापर्यंत कर्मचारी कामावर राहणार असल्याने १ एप्रिलच्या दिवशी सोमवारी सर्व बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय देखील ‘आरबीआय’ने घेतला आहे.