Raigad News : रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळून घडलेल्या दुर्घटेमध्ये २७ रहिवाशांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, ५७ रहिवासी बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेतून बचावलेल्या पीडित कुटुंबांना तीन गुंठे जमीन देण्यात येणार असून, सिडकोमार्फत घरे उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार महेश बालदी यांनी दिली.
सिडकोमार्फत पुनर्वसनाचे काम
या दुर्घटनेतून बचावलेल्या रहिवाशांचे तात्पुरते आणि कायमस्वरूपी पुनर्वसन अशा दोन टप्प्यांत व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये, तात्पुरत्या स्वरूपातील पुनर्वसन म्हणून कंटेनरमध्ये असून त्यांच्यासाठी आवश्यक कपडे, धान्य यांची व्यवस्था करण्यात आली आहे. (Raigad News) दरडग्रस्त १४१ रहिवाशांचे तात्पुरते पुनर्वसन चौक येथील डायमंड पेट्रोलपंप येथे कंटेनरमध्ये करण्यात आले आहे.
कायमस्वरूपी पुर्नवसनासाठी इर्शाळवाडी येथील दरडग्रस्त रहिवाशांना चौकजवळील मोरबे धरणानजीक सर्व्हे नंबर २७ येथे जागा देण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे पाच एकर जमिनीवर या रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असून, प्रत्येक कुटुंबाला तीन गुंठे जागा देण्याचे नियोजन आहे, (Raigad News) अशी माहिती आमदार महेश बालदी यांनी दिली.
याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या महिनाभरात सिडकोमार्फत पुनर्वसनाचे काम सुरू करण्यात येणार आहे. पीडितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांनी सिडकोशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्याचे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. (Raigad News) यामुळे दरडग्रस्त कुटुंबीयांची तत्पुरत्या कंटेनर हाऊसमध्ये काही महिने व्यवस्था करण्यात येणार असून, पुढील वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी कायमस्वरूपी घरे देण्याचा प्रयत्न आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Raigad News : इर्शाळवाडीत मृतदेह कुजल्याने दुर्गंधी; अखेर बचावकार्य थांबवण्याचा निर्णय!
Raigad News : रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळून १६ जण ठार ; शंभरहून अधिक लोक अडकल्याची भीती