Raigad News : रायगड : रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडावरील इर्शाळवाडीवर बुधवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. मध्यरात्रीनंतर तिथे बचावकार्य सुरू झालं. गुरुवारी दिवसभर बचावकार्य केल्यानंतरही अद्याप घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा असून, ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही एनडीआरएफने सकाळीच बचावकार्याला सुरुवात केली आहे. आज दिवसभर बचावकार्य चालण्याची शक्यता स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता
घटनास्थळी जेसीबी पोहोचणे अशक्य असल्याने २० फुटांचा दगड-मातीचा ढिगारा उपसण्याचे काम कुदळ-फावड्याच्या साहाय्याने केले जात आहे. या परिसरात संततंधार पाऊस सुरूच आहे. (Raigad News) या पावसातच एनडीआरएफची चार पथके बचावकार्य करत आहेत. खोदकाम केल्यावर पुन्हा पावसाचे पाणी साचून खड्डे भरतात. त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. मात्र, मातीखाली अडकलेल्या नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचल्यास अनेकांचे जीव वाचू शकतात, यासाठी एकेक मिनीट महत्त्वाचे असल्याची माहिती एनडीआरएफकडून दिली जात आहे.
आपण अनेकदा समाजातली माणुसकी संपल्याची चर्चा ऐकत असतो. अनेकदा यावरून प्रचंड उद्वेग आणि नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते. पण कोणत्याही मोठ्या संकटाच्या काळात खऱ्या माणुसकीचं दर्शन घडतं. हे आजपर्यंत असंख्य उदाहरणांमधून दिसून आलं आहे.(Raigad News) मग तो मुंबईतला पूर असो, करोनाची महासाथ असो किंवा मग दहशतवादी हल्ल्यांसारख्या भीषण घटना असोत. रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळगडावरील इर्शाळवाडीवर दरड कोसळली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनीच मदतकार्यासाठी धाव घेतली. पण याही गडबडीत एकीकडे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांना काढायची धडपड चालू असताना तिथेच अडकलेल्या मुक्या प्राण्यांना वाचवण्यासाठीही काहीजण धावले!
दरम्यान, इर्शाळवाडीतील ४८ घरांच्या वाडीतली २५ ते ३० घरं अद्यापही दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेतल्या निवेदनात सांगितले आहे. (Raigad News) एनडीआरएफला आतापर्यंत २१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. दुसऱ्या दिवशीही इर्शाळगडावर एनडीआरएफची चार पथकं बचावकार्य करत आहेत.
मुक्या प्राण्यांची सुटका
एकीकडे जवळच्या माणसांना गमावल्याचा टाहो गावकरी फोडत असताना दुसरीकडे मुक्या प्राण्यांना वाचवण्यासाठी आता दुर्गप्रेमी सरसावले असल्याचे चित्र आहे. इर्शाळगडावरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दुर्गप्रेमींनी एका चिखलात अडकलेल्या बैलाला वाचवल्याचा हा व्हिडीओ नेटिझन्सची दाद मिळवून जात आहे! (Raigad News) दुर्गसेवक राजेश सदाशिव भोर नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एक बैल चिखलात अडकला असून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न काही लोक करताना या व्हिडीओत दिसत आहे. बऱ्याच प्रयत्नांअंती बैलाला दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले. हा बैल उठून उभा राहिला आणि आसपासच्या लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Raigad News : रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळून १६ जण ठार ; शंभरहून अधिक लोक अडकल्याची भीती
Raigad News : इर्शाळवाडी ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही