( Rahul Kul ) दौंड : बोरीबेल (ता. दौंड) येथील रेल्वे भुयारी मार्गासाठी १० कोटी रुपयांचा निधी राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे. अशी माहिती दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल ( Rahul Kul ) यांनी दिली आहे. आमदार अॅड. राहुल कुल (Rahul Kul) यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर आज यश आले आहे.
बोरीबेल हे गाव रेल्वे लाईनमुळे दोन भागात विभागले गेले आहे. एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी व पाणी जाण्यासाठी असलेल्या छोट्या मोरीतून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. ही मोरी छोटी असल्याने त्यातून फक्त छोटी वाहने जात आहेत. रावणगाव आणि देऊळगाव राजे गावाकडे जायचे असल्यास या छोट्या मोरीमधून जावे लागत होते. त्यामुळे सदर ठिकाणी मोठ्या भुयारी मार्ग व्हावा. अशी मागणी येथील स्थानिक नागरिक व शेतकरी अनेक वर्षांपासून करीत होते.
दरम्यान, या मागणीचा पाठपुरावा करून आमदार अॅड. राहुल कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे रेल्वे भुयारी मार्गासाठी निधी मंजूर करून घेतला आहे.
७ मीटर रुंद व ६ मीटर उंच असलेल्या या भुयारी मार्गामुळे नागरिकांचे दळणवळण सोपे होणार असून, मोठ्या वाहनांना रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या भागात जाण्यासाठी पार करावे लागणारे लांबचे अंतर कमी होणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून आमदार अॅड. राहुल कुल यांनी मंजूर केलेल्या या कामाबाबत नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
बोरीबेलकरांची ५० वर्षांची मागणी पूर्ण…
रेल्वे लाईनमुळे दोन भागात विभागले गेले आहे. बोरीबेलकरांना मोठी वाहने दुसऱ्या भागात जाण्यासाठी मोठा वळसा घालून जावे लागत होते. त्या ठिकाणी मोठा भुयारी मार्ग करण्याची मागणी ग्रामस्थ वारंवार करत होते. आमदार अॅड. राहुल कुल यांनी पाठपुरावा करून हे काम मंजूर केल्याने मागील ५० वर्षांची मागणी पूर्ण झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
विधानसभा अध्यक्ष अ़ॅड राहुल नार्वेकर यांच्या वतीने आमदार राहुल कुल यांचे अभिनंदन
आमदार चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचे राहू येथे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते उद्घाटन
बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय योग्यच ; आमदार राहुल कुल