(Pune News ) पुणे : राज्य सरकारने महापालिकेचे आरोग्य प्रमुख आशिष भारती यांच्या बदली करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाला गेल्या काही वर्षांपासून पूर्णवेळ आरोग्य प्रमुख मिळालेला नाही. अखेर या पदावर नियुक्ती देण्यात आली असून राज्याच्या आरोग्य विभागाने तसे आदेश काढले असून त्यानुसार आरोग्य प्रमुख पदावर डाॅ. भगवान पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन वर्षांसाठी प्रतिनियुक्ती…!
डाॅ. भगवान पवार जिल्हा परिषदेचे आरोग्य आधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांची महापालिकेत दोन वर्षांसाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी या संवर्गातील डाॅ. आशिष भारती यांची ३० सप्टेंबर २०२० मध्ये महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदावर एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली होती.
त्यानंतर ८ फेब्रुवारी २०२२ मध्ये डाॅ. आशिष भारती यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ ४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत होती. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव चंद्रकांत वडे यांनी त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात
आणण्यासंदर्भातील आदेश काढले होते. या जागेवर डाॅ. भगवान पवार यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. डाॅ. भारती यांच्यापूर्वी डाॅ. रामचंद्र हंकारे यांच्याकडे प्रतिनियुक्तीने ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. डाॅ. भारती यांची बदली करण्यात आल्यानंतर पुन्हा प्रतिनियुक्तीने अधिका-याची नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime News : पुण्यात मोठा शस्त्रसाठा पकडला; १७ पिस्तूले व १३ जिवंत काडतूसे जप्त!
Pune News : अखेर रिक्षा चालकांची मागणी झाली पूर्ण ; महामंडळाची घोषणा!