Pune News : पुणे : पंतप्रधान पीक विमा योजना आणि फळपीक विमा योजनेत नोंदणी केलेल्या शेतकरी संख्येवरून महाराष्ट्राने देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तर या योजनेत राजस्थान पहिल्या, तर मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमाकांवर आहे. (Pune News)
पीक विम्यासाठीच्या अर्जांची संख्या १ कोटी ६९ लाख ४८ हजार ७९०
कृषी विभागाचे प्रमुख सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातून पंतप्रधान पीक विमा योजना आणि फळपीक विमा योजनेसाठी एकूण १,७१,२१,७६९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यात पंतप्रधान पीक विम्यासाठीच्या अर्जांची संख्या १ कोटी ६९ लाख ४८ हजार ७९० आहे. (Pune News)
दरम्यान, इतर अर्ज फळपीक विमा योजनेसाठीचे आहेत. या सर्व अर्जांद्वारे १,१३,६७,६७१ हेक्टरवरील खरीप पिके आणि फळपिके संरक्षित झाली आहेत. अशी माहिती आवटे यांनी दिली आहे. (Pune News)