राजेंद्रकुमार शेळके
Pune News : पुणे : नागपूर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३० व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मुरहरी केळे यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिली. १४ ऑक्टोबर २०२३ रोजी वसंतराव देशपांडे सभागृहात हे साहित्य संमेलन संपन्न होणार आहे.
१४ ऑक्टोबर रोजी होणार साहित्य संमेलन
डॉ. मुरहरी केळे यांनी अहिल्यादेवी होळकर, संतवाणी, मी एम. एस., जगी ऐसा बाप व्हावा, शब्दशिल्प, नानी आदी ग्रंथांचे लेखन केले आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. (Pune News) या पूर्वी द. मा. मिराजदार, शिवाजी सावंत, नारायण सुर्वे, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, केशव मेश्राम, विश्वास पाटील, गंगाधर पानतावणे, आ. ह. साळुंखे, नरेंद्र जाधव, भास्कर चंदनशिव, श्रीपाल सबनीस आदी मान्यवर साहित्यिकांनी या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद भूषविले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : उपचाराच्या बहाण्याने तरुणींना बांगलादेशातून बोलावले अन् थेट कुंटणखान्यात बसवले…
Pune News : मुंढवा, हडपसरमधील रस्त्यांच्या विकासासाठी महापालिकेची १७० कोटींची निविदा