Land NA Permission : कृषक जमिनीचा वापर अकृषक (नॉन एग्रीकल्चर झोन) कामासाठी करण्याकरिता आता ग्रामपंचायतींना अधिकार देण्यात आले असून गावापासून २०० मीटरच्या आत बांधकाम करताना स्वतंत्रपणे परवान्याची गरज नाही. महसूल विभागाने यासाठी शासन आदेश काढला आहे. आधी ही परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून घ्यावी लागत होती. (P now Hand over to Gram Panchayat)
महसूल विभागाचा आदेश
कृषक जमिनीचा वापर अकृषक (नॉन एग्रीकल्चर झोन) कामासाठी करण्याकरिता अगोदर खूप किचकट अशी प्रक्रिया होती व याकरिता साधारणपणे एक ते दीड वर्षाचा कालावधी जात होता. (Land NA Permission) आता अगोदरच्या पद्धतीनुसार आता याकरिता दोन प्राधिकरणांकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचा विचार केला तर त्यानुसार ज्या जमिनीचा वापर शेतीसाठी करण्यात येतो किंवा करण्यात येत आहे अशा जमिनीचा वापर जर कृषी व्यतिरिक्त म्हणजेच अकृषीक करण्याकरिता करायचा असेल तर त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांचे परवानगी घ्यायला लागत होती. परंतु आता यामध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शासनाने घेतलेले या निर्णयामुळे आता ग्रामपंचायतकडे बांधकाम परवान्याच्या अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायत मध्येच अकृषीक परवाना शुल्क भरून घेतले जाणार आहे. (Land NA Permission) याकरिता बांधकाम आणि विकसन परवानग्या देण्यासाठी बांधकाम परवानगी व्यवस्थापन ही ऑनलाईन प्रणाली वापरण्यात येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune | व्याख्याते जगदीश ओहोळ यांचा प्रबोधनकार पुरस्काराने गौरव..