बंगळूर Politics : कर्नाटक राज्यात काँग्रेस पक्षाने एकहाती बाजी मारली आहे. (Politics) त्यामुळे काँग्रेस आता सत्ता स्थापन करणार आहे. मात्र त्याआधी मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. (Politics) काँग्रेसच्या मुख्य नेत्यांनी मुख्यपदासाठी दावा केला आहे. (Politics) असे असेल तरी आता कर्नाकटचे पुढचे मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री होणार. (Politics) हे आता जवळपास निश्चित झाले आहे. (Politics)
पक्षश्रेष्ठींचे मन वळविण्यात यश – सिद्धरामय्या
सिद्धरामय्या यांनी दिल्लीत जावूने पक्षश्रेष्ठींचे मन वळविण्यात यश मिळविले असून त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार, हे पक्के झाले आहे. दरम्यान, प्रकृतीचे कारण देत शिवकुमार यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला आहे. त्याचीही चर्चा कर्नाटकात जोरात रंगली आहे.
दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनही सिद्धरामय्या यांना ‘ऑल द बेस्ट’ म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी शिवकुमार यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.
डी. के. शिवकुमार हे सोमवारी संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार होते. त्यांनी रात्री साडेसात वाजता दिल्लीला जाण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाचे तिकीटही काढले होते. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांचा दिल्ली दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर सदाशिवनगर येथील त्यांच्या निवासस्थानी ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सिद्धरामय्यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या.
शिवकुमार म्हणाले की, आजारपणामुळे मी दिल्लीचा दौरा रद्द केला. चेंडू आता केंद्रीय नेत्यांच्या कोर्टात आहे. कर्नाटकातील ऐतिहासिक विजयामागे कोण आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. सिद्धरामय्या यांच्याकडे संख्याबळ आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. मी बंडखोर नाही आणि ब्लॅकमेल करत नाही. मला दृष्टी आहे. मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. मी षड्यंत्राला कधीही बळी पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune : प्रेमाचा विरोध जिव्हारी लागलाच महिलेची हत्या; कर्नाटकातून आरोपीला ठोकल्या बेड्या