दिल्ली Politics : गेल्या वर्षी जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड केले. तेव्हापासून या सत्तासंघर्ष सुरु झाला. हा सत्तासंघर्ष न्यायालयात गेला होता. (Politics) त्यावर आज सुनावणी घेण्यात आली. (Politics) १५ मे रोजी न्यायमूर्ती एम. आर. शहा निवृत्त होत आहेत. २० मे ते २ जुलै अशी सुप्रीम कोर्टाची उन्हाळी सुटी असणार आहे. (Politics) त्यामुळे हा निकाल आज (गुरुवारी) देण्यात आला. (Politics)
प्रकरण आता सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग
सत्तासंघर्ष प्रकरणात अध्यक्षांच्या अधिकाऱ्याचे प्रकरण आता सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. या सुनावणीचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. घटनापीठात सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे.
सत्तासंघर्ष निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. निकालानंतर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : महाराष्ट्र सत्तासंघर्ष ! शिंदे गटाला मोठा धक्का ; भरत गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर
Big News : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाच्या वाचनाला सुरुवात…