Parbhani News परभणी: शेतात राबूनही पिक उगवत नव्हते. या सततच्या नापिकीला कंटाळून आई-वडिलांनी आत्महत्या केली. मुल पोरकी झाली. मोठ्या भाऊ वटवृक्षासारखा खंबीरपणे उभा राहिला. लहान तीन भावांच्या डोक्यावरील छत्र हरपलं. त्यांना आधार देत रक्ताचं पाणी करुन त्यांना शिकवले. त्याच्या कष्टाचे चीज करत तिन्ही भावांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये एकाच वेळी पोलिस भरती होत यशाला गवसणी घातली. (Admirable! Parents ended their lives, elder brother shed blood and three brothers became policemen in the first attempt)
तिघा भावांच्या या यशामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
परभणी जिल्ह्यातील तिघांची यशोगाथा
कृष्णा सिसोदे, ओंकार सिसोदे, आकार सिसोदे अशी पोलीस दलामध्ये निवड झालेल्या गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील या तिघा भावांची नावे आहेत.
माखणी या गावामध्ये राहणाऱ्या आकाश सिसोदे, कृष्णा सिसोदे, ओंकार सिसोदे, आकार सिसोदे यांच्या आई-वडिलांनी सततच्या नापीकीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यामुळे आकाश सिसोदे या मोठ्या भावाच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. गावात सालगऱ्याचे काम करून भावंडांचे शिक्षण सुरु ठेवले.
आकाश याने आपल्या तिन्ही भावांना गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये दुसरीपर्यंत शिक्षण दिले. नंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी परभणी शहरातील खानापूर फाटा येथे असलेल्या एका आश्रम शाळेमध्ये पाठवले. मात्र, ही शाळा बंद पडल्याने कृष्णा सिसोदे, ओंकार सिसोदे, आकार सिसोदे यांना सातवीपर्यंत शिक्षण घेता आले.
शाळा बंद झाल्यानंतर आता पुढील शिक्षणाची काय होणार अशा चिंतेमध्ये सिसोदे बंधू असतानाच परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ या शिक्षण संस्थेने तिन्ही भावाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. या ठिकाणी त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिन्ही भावांनी पुण्याची वाट धरली आणि महिला आणि बालविकास विभागाच्या वस्ततीगृहामध्ये काम करत शिक्षणाच्या प्रवाहामध्ये राहिले. याच दरम्यान राज्य शासनाने पोलीस भरतीची घोषणा केली आणि त्याची जाहिरात निघाली त्यामुळे कृष्ण आणि आकार यांनी मुंबई तर ओंकार याने परभणी येथे पोलीस भरतीचा अर्ज भरला. तिघांचीही निवड झाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : यापुढे बालवाडी, नर्सरी सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार
Pune News : एचडीएफसी बँकेच्या रिलेशन मॅनेजरनेच घातला १ कोटी ६५ लाखाला गंडा