सुरेश घाडगे
Paranda News | परंडा : परंडा नगर परिषदचे मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांच्यावरील गैरकारभाराच्या आरोपाची चौकशी करुन त्यांच्यावर करावाई करावी, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.
धाराशिव जिल्हाधिकारी यांनी तज्ञांची चौकशी समिती नियुक्त केली होती. या अनुषंगाने मुख्याधिकारी यांच्या विरूध्द चौकशी अहवालानुसार कारवाई करण्यात यावी , अन्यथा बुधवारी (ता.३१) परंडा तहसिल कार्यालय येथे आत्मदहन करण्यात येईल. असा इशारा देण्याता आला असून निवेदन जिल्हाधिकारी देण्यात आले आहे.
या निवेदनावर माजी नगरसेवक अॅड. नुरोद्यीन चौधरी (काँग्रेस ), माजी उपनगराध्यक्ष ईस्माईल कुरेशी, इरफान शेख ( शिवसेना, ठाकरे गट), माजी नगरसेवक जावेदखॉ पठाण , रहेमतुल्ला उर्फ सत्तार पठाण, जमील पठाण ( एमआयएम ता . अध्यक्ष) ,अझहर शेख, समीर पठाण, अॅड. जहिर चौधरी (भाजपा) , सत्तार पठाण ,बाशा शहाबर्फीवाले ( राष्ट्रवादी काँग्रेस ) यांची स्वाक्षरी आहे.
गैरकारभारा बाबत पुराव्यासह आरोप…
मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ०२/१०/२०२२ रोजी परंडा तहसिल कार्यालयात आत्मदहनाचे आंदोलन केले होते. तसेच उपविभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालय यांना केलेल्या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी भुम यांची चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्ती केली होती. त्यांच्यासमोर या सर्वांनी मुख्याधिकारी यांच्या गैरकारभारा बाबत पुराव्यासह आरोप केले होते.
त्यानंतर उपविभागीय अधिकारी भूम यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशी योग्यरित्या होण्याकरिता तज्ञामार्फत चौकशी होणे गरजेचे असल्याचे नमूद करून त्यांनी आपला अहवाल ११/११/२०२२ रोजी जिल्हाधिकारी यांना पाठवला होता. त्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांची २७/१२/२०२२ रोजी मुख्याधिकारी यांची चौकशी होणेकामी तज्ञांची नियुक्ती करून चौकशी समिती करावी, अशी विनंती केली होती.
दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी…
०६/०१/२०२३ रोजी चौकशी अधिकारी म्हणून भुम नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच त्यांच्यासोबत दोन सदस्य चौकशी समिती नेमुण एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. चौकशी समितीने ३१/०१/२०२३ रोजी तक्रारदारांना नोटीस देवुन म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी दि . ३१/०१/२०२३ रोजी तोंडी व लेखी स्वरूपात व तसेच दि . १३/०२/२०२३ रोजी सर्व पुराव्यासह लेखी उत्तर दिलेले आहे. त्यास दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. परंतु अद्याप चौकशी अधिकार्यांनी अहवाल सादर केला आहे किंवा नाही. किंवा त्याच्या अनुषंगाने काय कारवाई प्रस्तावित केली आहे.
याबाबतची कसलीच माहिती आजपर्यंत तक्रारदारांना देण्यात आलेली नाही. चौकशी तथा कारवाईस होत असलेला विलंब संयमाचा बांध तोडत आहे. त्यामुळे दि . २५/०५/२०२३ रोजीपर्यंत मुख्याधिकारी नगर परिषद परंडा यांच्या विरूध्द चौकशी अहवालानुसार कारवाई न झाल्यास दि . ३१/०५/२०२३ रोजी तहसिल कार्यालय परंडा येथे आत्मदहन करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune crime : शारीरीक संबंधानंतर जबरदस्तीने केला गर्भपात ; लग्नाचा विषय काढल्यावर जातीवाचक शिवीगाळ