Pandharpur पंढरपूर, (सोलापूर) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरीतील (Pandharpur )विठुरायाला जालन्यातील एका विठ्ठलाच्या भक्ताने तब्बल पावणे दोन किलो सोन्याचे दागिणे अर्पण केले आहे. मोहिनी एकादशीच्या निमित्ताने या भक्ताने हे दान केले आहे.
यामध्ये सोन्याचे धोतर,कंठी आणि सोन्याचा चंदनाचा हार असे दान केली आहे. या भक्ताने हे दान नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर केले आहे. यापूर्वी याच भाविकाने १ कोटी ८० लाख रुपयाचे दान विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले होते.
याबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माहिती दिली कि, आज मंदिर समितीला आणि विठ्ठलाच्या चरणी जालन्याच्या एका भक्तानं धोतर, चंदनाचा हार आणि कंठा अर्पण केला. यानंतर सन्मान स्विकारण्यास देखील त्यांनी नकार देत मनाचा मोठेपणा दाखवून दिला.
आज मोहिनी एकादशीच्या मुहूर्तावर विठोबाच्या चरणी पावणे दोन किलो वजनाचे सोन्याच्या धोतर, तसेच नाजूक बनावटीचा चंदन हार आणि सुंदर कलाकुसर असणारा कंठा असे सव्वा कोटी रुपये किमतीचे मौल्यवान दागिने जालना येथील या महिला भाविकाने अर्पण केले आहे.
हे दागिने आज मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यानंतर सदर दागिने देवाच्या चरणी अर्पण करून देवाला परिधान करण्यात आले.
भक्ताकडून सुमारे तीन कोटींचे दान…!
सव्वा कोटी रुपयांच्या दानमुळे गरिबांचा देव असणाऱ्या विठुरायाची श्रीमंती आणखी वाढली आहे. कारण विठ्ठलाच्या खजिन्यात एकाच भक्ताकडून सुमारे तीन कोटींचे दान मिळाले आहे. दरम्यान, वर्षभरात देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक हे विठ्ठलाच्या चरणी आपल्या इच्छेनुसार दान करत असतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Madha News : ग्रामीण भागात बँका चालविणे जबाबदारीचे व कसरतीचे काम चेअरमन अशोक लुणावत