Palghar News : पालघर : समुद्रकिनाऱ्यावर फिरायला अतिउत्साह पाहायला मिळतो. कितीही नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या तरी त्याकडे पर्यटक दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. असाच एक प्रकार समोर आला आहे.
अतिउत्साह आला अंगलट
डहाणूतील चिंचणी येथील समुद्रकिनाऱ्यावर अशीच काहीशी एक घटना समोर आली आहे. (Palghar News) चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाने अतिउत्साहात आपली कार समुद्रकिनाऱ्यावर थेट संरक्षक भिंतीच्या खाली उतरवली. पर्यटकाचा अतिउत्साह त्याच्या अंगलट आला असून समुद्राला आलेल्या भरतीमुळे ही कार समुद्राच्या पाण्यात बुडाली. समुद्राला भरती आल्याचे पर्यटकाच्या लक्षात न आल्याने हा प्रकार घडला. (Palghar News) अर्ध्यापर्यंत बुडलेली ही कार समुद्राला आलेल्या भरतीत वाहून जाते की काय? कार समुद्रातून बाहेर कशी काढावी असा प्रश्न निर्माण झाला. मात्र काही वेळाने समुद्राला ओहोटी आल्यानंतर कार समुद्रातून बाहेर काढण्यात आली. मात्र समुद्राचे पाणी या कारमध्ये शिरून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दुधात भेसळ करणा-यांना मोक्का लावणार! : दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Pune News : धक्कादायक! सुपारी घेऊन पत्रकारावर गोळीबार ; जमिनीच्या व्यवहारातून घडला प्रकार