लहू चव्हाण
Pachgani news : पाचगणी : महिलांना स्वावलंबी व अधिक सक्षम करण्यासाठी विश्वकर्मा नागरी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून पाचगणी परीसरातील महिला बचतगटांना अर्थसाहाय्य देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पतसंस्थेचे ग्रामीण भागातील कार्य कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन विश्वकर्मा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष शेखर भिलारे यांनी केले.
पाचगणी व राजपुरी येथील महिला बचतगटांना सूक्ष्म कर्ज योजनेतंर्गत अर्थसाहाय्य
संस्थेच्या माध्यमातून पाचगणी व राजपुरी येथील महिला बचतगटांना सूक्ष्म कर्ज योजनेतंर्गत अर्थसाहाय्य वितरण प्रसंगी भिलारे बोलत होते. यावेळी संस्थापक चंद्रकांत पाडळे, (Pachgani news) उपाध्यक्ष महेश खांडके, व्यवस्थापिका नयना पाडळे संचालक राजेश पारठे, हितेश दवे, नितीन शिंदे, महेश माने, चंद्रकांत ढेबे, सुनील बेलोशे, योगेश मालुसरे, प्रशांत मोरे, गुरुदत्त ताकवणे, राजेंद्र पार्टे, संचालिका संगिता कासुर्डे, रेखा भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेखर भिलारे पुढे म्हणाले, पांचगणी परिसरातील ग्रामीण भागातील बचत गटांना कर्ज वाटप करण्यात येणार आहे. यासाठी कमीत कमी व्याजदर आकारला जाणार आहे. संस्थेच्या माध्यमातून बचतगटांना लघु कर्जसुद्धा देण्यात येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : पाचगणीतील रस्त्यामधील अतिक्रमण व अडथळे नगरपरिषदेने हटविले
Pachgani News : जालना लाठीमाराच्या निषेधार्थ उद्या ‘पाचगणी शहर बंद’ची हाक..
Pachgani News : पाचगणीमध्ये उद्योजकता विकास यात्रेच्या रथाचे तरूणाईकडून जल्लोषात स्वागत