लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : भारतीय संस्कृतीत राखी पौर्णिमेच्या सणाला मोठे महत्त्व आहे. या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतीक म्हणून भावांना राख्या बांधतात आणि बहिणीचे रक्षण करावे तसेच त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे, यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. नेमका हाच संदेश देऊन एंजल टायनी टाॅट इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी वटवृक्षाला राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला.
पाचगणीतील चिमुकल्यांचे अनोखे रक्षाबंधन
यानिमित्त पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व मुलांना सांगण्यात आले. या उपक्रमात मुख्याध्यापिका स्नेहा भिलारे, शिक्षिका करिश्मा पिसे, (Pachgani News) रुपाली बिरामणे, तेजश्री चिकणे व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या वेळी शाळा परिसरातील वृक्षांची पूजा करत झाडांना राखी बांधण्यात आली.
रक्षाबंधनासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या वापरण्यात आल्या. झाडाला राखी बांधून त्यातून वृक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. (Pachgani News) यातून शिक्षक व विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सणानिमित्त सर्वांना मोलाचा संदेश दिला.
Pachgani News : पाचगणी-वाई मार्गावरील अनधिकृत शेडचे पक्के बांधकाम हटवले