लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : पाचगणी रोटरी क्लब लोकहितासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. गणेशोत्सव काळात कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी टेबल लॅंड पठारावर विसर्जनस्थळी पाचगणी रोटरी क्लबने ‘निर्माल्य कलश’ उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे पर्यटननगरीत शून्य कचऱ्याची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी रोटरी क्लबची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शून्य कचऱ्याची संकल्पना सत्यात उतरण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल
पाचगणी टेबल लॅंड पठारावर शहराबरोबरच जवळपासच्या गावातील गणपती विसर्जनासाठी येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा होत असते. (Pachgani News) निर्माल्यामुळे टेबल लॅंड तलावाचा परिसर अस्वच्छ दिसू नये यासाठी पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्निल परदेशी यांच्या संकल्पनेतून पाचगणी रोटरी क्लबने हा निर्माल्य कलश उपलब्ध करून दिला आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव संपन्न व्हावा, यासाठी गणेशभक्तांनी निर्माल्य तसेच अन्य प्रकारचा कचरा निर्माल्य कलशात टाकण्याचे आवाहन रोटरीयन जयवंत भिलारे यांनी केले.
यावेळी रोटरीयन अली अजगर शेववाला म्हणाले, (Pachgani News) स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पाचगणी नगरपालिका सदैव अग्रेसर राहिली आहे. पालिकेला शून्य कचरा व्यवस्थापनासाठी मदत व्हावी, यासाठी पाचगणी रोटरी क्लबच्या वतीने हा निर्माल्य कलश उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यावेळी सेक्रेटरी नितीन कासुर्डे, रोटरीयन आदित्य गोळे, किरण पवार, ऋशी होळकर, जयवंत भिलारे, हिमांशू पुरोहित, अली अजगर शेववाला, नचिकेत बोधे, भूषण बोधे, विशाल रांजणे, अविनाश माने, अमित भिलारे, अमित बोधे, धवल पुरोहित, आपत्ती व्यवस्थापनाचे सुर्यकांत कासुर्डे, स्वच्छता निरीक्षक गणेश कासुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : गोंदवले येथील राज्यस्तरीय नाट्य महोत्सवात साताऱ्याच्या ‘पौर्णिमा’ची बाजी
Pachgani News : ‘पाचगणी’ सोसायटीने नागरिकांना उन्नतीची संधी दिली- आशिष दवे
Pachgani News : पाचगणी रोटरी क्लबच्या वतीने शाळांना डिजिटल रूमच्या साहित्याचे वाटप