लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : एकल प्लास्टिकला कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड अधिकारी, महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. एकल प्लास्टिक वापरावर कारवाई करत, शहरातून दोन दिवसांत सुमारे २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमाची कडक अंमलबजावणी
पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग, मंत्रालय यांच्याकडील प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६ पासून वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारीत अधिसूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
फुग्यासाठी प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे ध्वज, कॅन्डी स्टीक्स, आईस्क्रीम स्टीक्स, सजावटीसाठी थर्माकोल, प्लेट, कप, ग्लास, कटलरी उदा. काटे, चमचे, चाकू, ट्रे, मिठाईच्या खोक्यांभोवती फिल्म गुंडाळणे किंवा पॅकींग करणे, निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पाकिटे, १०० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक आदी वस्तूंवर बंदी आहे. (Pachgani News) या बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास पहिल्या गुन्ह्यास ५ हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यास १० हजार रुपये तर तिसऱ्या वेळी गुन्हा केल्यास २५ हजार रुपये दंड व ३ महिन्यांचा कारावास अशी शिक्षेची तरतूद आहे.
महाबळेश्वर तालुका इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे पर्यटन नगरी पाचगणी शहरात प्लास्टिकचा वापर टाळणे आवश्यक असून, शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले. (Pachgani News) या कारवाईत पाणीपुरवठा अभियंता दिग्विजय गाढवे, आरोग्य विभाग प्रमुख सुरेश मडके, आरोग्य निरीक्षक गणेश कासूर्डे, सागर बागडे, अफझल डांगे या पालिका कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : पाचगणीतील अवकाळी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने वृक्षारोपण