Pachgani news : पाचगणी: पाचगणी येथील टेबल लॅंन्ड पठारावरील एका घोड्याला ग्लॅडर्स हा संसर्गजन्य रोग झाल्याचे समोर आले आहे. ज्या घोड्याला या रोगाची लागण झाली त्याला दयामरण देण्यात आले आहे. ग्लॅडर्स रोग संसर्गजन्य असल्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून पाचगणी व परिसरातील सर्व घोड्यांचे रक्ताचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. (A horse euthanized on the table land plateau in Pachagani…)
ग्लॅंडर्स रोगाची झाली होती लागण
ग्लॅडर्स आजारामध्ये घोड्याला ताप येऊन तो अन्न पाणी काही घेत नाही, अशक्तपणामुळे त्याला इतर त्रास होतात, घोड्याच्या त्वचेवर चिरा पडणे, सर्दी, निमोनिया सारखी लक्षणे दिसतात. (Pachgani news) हा संसर्गजन्य आजार असल्याने घोड्यांना विलगीकरणात ठेवण्यात येते. यापूर्वीही पाचगणी येथे या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता.या आजाराबाबत घोडेमालकांना सूचना देऊन काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
या आजारामुळे घोड्यांना शरीरावर मोठं-मोठे फोड येतात. फोड फुटल्यानंतर त्यातून पू आणि रक्त बाहेर पडते. या रक्त आणि पू मुळेच ग्लॅडर्सचा विषाणू इतर प्राण्यांच्या किंवा माणसांच्या शरीरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही हा आजार सांसर्गिक व मानवास संक्रमित होणारा असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.(Pachgani news) रक्ताचे नमुने गोळा करण्यासाठी पाचगणी व परिसरातील घोडे व्यावसायिकांनी सहकार्य करावे अशा लेखी सूचना पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आल्या आहेत.