अहमदनगर : तुम्ही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल, एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेनला किमान अर्धा तास लागतो किंवा कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो. रेल्वे स्थानकावर अनेक प्लॅटफॉर्म आणि अनेक ट्रॅक असतात. परंतु, एकाच ठिकाणी दोन रेल्वे स्थानके असल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे. म्हणजेच या ट्रॅकच्या बाजूला एक रेल्वे स्टेशन आणि दुसऱ्या बाजूला दुसरे रेल्वे स्टेशन होय. असे एकाच ठिकाणी दोन भिन्न रेल्वे स्थानके असू शकतात हे फार कमी लोकांनी ऐकले असेल, परंतु हे अगदी खरे आहे. कारण जगात फक्त महाराष्ट्रातच अशी एकाच ठिकाणी दोन भिन्न स्थानके आहेत. त्यामुळे आता त्या ठिकाणाबद्दल जाणून घेऊयात.
अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर आणि बेलापूर अशी दोन वेगवेगळी रेल्वे स्टेशन आहेत. दोन रेल्वेमार्गावर असलेली ही रेल्वे स्टेशन एकाच ठिकाणी आहेत. बेलापूर आणि श्रीरामपूर शहरापासून ५ किमी अंतरावर हे रेल्वे स्टेशन आहे. एक रेल्वे स्टेशन उजव्या बाजूला असून दुसरा रेल्वे स्टेशन डावीकडे आहे. एखादा प्रवासी पहिल्यांदाच या रेल्वे स्टेशनवर आला, तर त्याचा पुरता गोंधळ उडतो. चुकीच्या ट्रेनने प्रवास तर केला नाही ना? असा प्रश्नही काही प्रवाशांना पडतो.
महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये एक स्टेशन खूप लोकप्रिय आहे. तिकिट काढण्याआधी प्रवाशांनी ट्रेन कोणत्या स्थानकावर जाणार आहे, याची खात्री करुन घ्यावी. कारण श्रीरामपूर आणि बेलापूर स्टेशन एकाच जागेवर आहेत. ही दोन्ही रेल्वे स्टेशन टॅकच्या विरुद्ध दिशेला आहेत.
दरम्यान, रेल्वे स्टेशनवर दिवसेंदिवस वाढणारी वर्दळ पाहता, लोकांची रेल्वे ट्रेनमधून प्रवास करताना दमछाक होते. अशा परिस्थितीत एकाच जागेवर जर दोन वेगवेगळी रेल्वे स्टेशन बांधण्यात आली असतील, तर प्रवाशांचा किती गोंधळ उडत असेल, याचा अंदाजही लावता येणार नाही. परंतु, ही दोन्ही वेगवेगळी रेल्वे स्थानके एकाच जागेवर असल्यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ होतो.