पुणे : महिला आज पुरुषाच्या खांद्याखांदा लावून प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. हवं तर एक पाऊल पुरुषाच्या पुढे कधीच टाकले आहे. असे कोणते क्षेत्र राहिले नाही की, तिथे आता महिला नाही. आता मग ‘या’ क्षेत्रात ‘ती’ कुठे मागे राहिली आहे. थेट बुलेटवर भ्रमंतीला जाणाऱ्या महिला आपण पाहिल्याच असतील… पण.. ‘ती’ नेहमी हवेत प्रवास करणारी आता मराठमोळा साज चढवत जगभ्रमंतीली निघालेली आहे.
सांस्कृतिक पेहराव करून अगदी नऊवारी साडी नेसून जगभ्रमंतीला चिंचवडची मराठमोळी वैमानिक रमीला लटपटे. रमीला ही वैमानिक असून एक उद्योजिकाही आहे. राज्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन करून महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विविध पैलूंना प्रोत्साहन देण्यासाठी ती हा प्रवास करणार आहे. यासाठी तिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
रमीला 9 मार्च रोजी दुपारी 4:30 वाजता मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून प्रवासाला सुरुवात करणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंतनू नायडू, प्रसाद नगरकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आणि सुरेश भोईर ध्वजवंदनासाठी उपस्थित राहणार आहेत.