Old Pension : कर्मचाऱ्यांच्या या संपला (Old Pension )वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. ‘कर्मचाऱ्यांचा मुद्दा जरी बरोबर असला, तरी त्यासाठी संपाची मागणी करणं योग्य नाही. त्याऐवजी आम्ही जसा न्यायालयीन लढा दिला, त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दाद मागायला हवी’, अशी भूमिका सदावर्ते यांनी मांडली आहे.
त्याच आधारावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले आहेत.
शांततेने निषेध करण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार आहे हे मान्य केले तरी मूलभूत सेवा मिळण्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत? याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांची याचिका…
जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अशातच आता जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा आता हायकोर्टात गेला आहे. विद्यार्थी आणि रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याचा दाखला देत हा संप बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune Crime News | पुणे : क्रेडीट कार्डचे पिन जनरेट करण्यास सांगून लुबाडले तब्बल साडेसात लाख
Pimpari Crime News : अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आई-वडिलांकडून उकळले पैसे
Kondhwa News : कोंढवा भागातील वाहतूकीत बदल; एकेरी मार्ग..! ;हा; मार्ग केला बंद