Wednesday, May 21, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता नागरिकांना एका क्लिकवर मिळणार शिधापत्रिका…!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 July 2024, 16:09

– संगीता कांबळे

पिंपरी : राज्य सरकारकडून आता नागरिकांना ई-शिधापत्रिका (ई-रेशनकार्ड) मिळणार आहेत. त्यामुळे लोकांना आता सरकारी कार्यालयाच्या खेपा मारायची गरज नाही. या शिधापत्रिका ऑनलाइन अर्ज करून उपलब्ध होणार आहेत. मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपवर या शिधापत्रिका आपल्याला डाऊनलोड करून ठेवता येणार आहे. तसेच गरज पडेल तेव्हा त्याची प्रिंटआऊटदेखील आपण घेऊ शकतो.

विशेष बाब म्हणजे ही ई-शिधापत्रिका निःशुल्क मिळणार आहे. त्याची कार्यवाही सध्या सुरू झाली आहे. त्याचा राज्यभरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनचे खजिनदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांनी केले आहे.

सध्या लाडकी बहीण योजना, उत्पन्न दाखले, शाळा-कॉलेज अ‍ॅडमिशन, रुग्णालये, महात्मा फुले योजना, आयुष्यमान भारत योजना आदी ठिकाणी शिधापत्रिकेची मागणी केली जाते. नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी पूर्वी शासकीय कार्यालयाचा उंबरठा झिजवावा लागत असे. तसेच नागरिकांची आर्थिक लुट देखील होत होती. त्यामुळे राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने याबाबत नुकताच निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय अन्न योजना (एएवाय) आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील (पीएचएच) शिधापत्रिकाधारक तसेच, राज्य योजनेच्या (एपीएल) शेतकरी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेव्यतिरिक्त (एनपीएच), एपीएल शेतकरीव्यतिरिक्त तसेच एपीएल शुभ्र शिधापत्रिकाधारक अशा सर्व रेशनकार्डधारकांना ई-शिधापत्रिका मोफत मिळणार आहे. अर्जदारांनी या शिधापत्रिकांसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांच्या अर्जाची तपासणी केली जाईल. त्यानंतर त्यामध्ये पात्र ठरणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई-शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

अशी काढा ई-शिधापत्रिका

– नागरिकांनी https://rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
– होमपेजवर लॉग इन करावे.
– विनंती केलेली सर्व माहिती भरावी. कागदपत्रे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक खात्याचे तपशील अपलोड करावा.

नवीन शिधापत्रिका, पत्त्यामध्ये बदल करणे, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा शिधापत्रिकाविषयक अनेक प्रकारच्या सेवा ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत Public Login वर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

‘नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी लोकांची रेशनिंग कार्यालयात गर्दी वाढत आहे. नागरिकांनी शासनाच्या वेबसाईटवर जाऊन पब्लिक लॉग इन करून शिधापत्रिकाविषयक कामे करून घ्यावीत. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल. तसेच सध्या पावसाळा असल्यामुळे रेशन दुकानदारांना नेटवर्कच्या अडचणी जाणवत आहेत. धान्य वाटप करताना सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे शासनाने चार महिन्यांसाठी ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटपास परवानगी द्यावी. ई-शिधापत्रिका सुविधेचा शंभर टक्के वापर व्हायला हवा. त्यासाठी यापुढील काळात जास्तीत जास्त लोकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सक्ती करावी. पर्यायाने, सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट थांबेल.
– विजय गुप्ता, खजिनदार – ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

CM Devendra Fadnavis and DCM ajit Pawar pay tribute to jayant naralikar pune

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले अंत्यदर्शन

Wednesday, 21 May 2025, 18:55

शिरूर बसस्थानकातील चोरी प्रकरणाचा छडा; दोन अट्टल महिला चोरांना अटक, ४.६८ लाखांचा ऐवज जप्त

Wednesday, 21 May 2025, 18:50
recruitment of assistant commissioner in animal husbandry department

पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागातील सहायक आयुक्त पदाच्या ३११ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Wednesday, 21 May 2025, 18:45

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? अजित पवारांनी दिले संकेत

Wednesday, 21 May 2025, 18:30

उरुळी कांचन येथे एकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट

Wednesday, 21 May 2025, 18:25
Who was Nambala Keshava Rao alias Basavaraju? Topmost Naxal leader killed in Chhattisgarh encounter

अनेक नावं, AK-47 चा शौकीन, बॉम्ब बनवण्यात उस्ताद … ७० च्या दशकापासून आतापर्यंत बसवराजूच्या दहशतीची कहाणी

Wednesday, 21 May 2025, 18:24
Next Post

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी शशिकांत शेंडे

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.