नाशिक : आर्थिक वादातून टोळक्याने मित्राचा खून केल्याची घटना गाडगे महाराज मठ भागातील शिरीषकुमार चौक भागात घडली. मोटरसायकल दुरुस्तीचे पैसे मागितल्याने ही घटना घडली असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर कदम व त्याचे साथीदार असे मित्राची हत्या करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. याबाबत सिंधू सुरेश सावंत (वय ६६, रा. शिवाजीनगर, नाशिक-पुणे रोड) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत सचिन उर्फ बबल्या सुरेश सावंत (वय ४२) यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित मयूर कदम आणि मृत सचिन सावंत हे दोघे मित्र एकत्रित काम करीत असताना सचिनने मयूरच्या दुचाकी दुरुस्तीसाठी नऊ हजार रुपये खर्च – केले. त्यानंतर दुरुस्त करण्यात आलेल्या दुचाकीचा सचिनच वापर करीत होता. त काही दिवसांनी मयूरने या दुरुस्तीपोटी साडेचार हजार रुपये दिले होते. मात्र, सचिनने उर्वरित पैशांसाठी तगादा लावल्याने ही घटना घडली.
गेल्या बुधवारी (दि.१७) टी सायंकाळच्या सुमारास सचिन सावंत जुन्या नाशिक परिसरातील पाटकरी लॉज भागात असताना मयूर कदम एका साथीदारासह तेथे आला. यावेळी सचिनने त्याच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली असताना संतप्त मयूर याने आपल्या दुचाकीवर सचिनला ट्रिपल सीट बसवून घेत त्यास गाडगे महाराज मठ भागातील मनपाच्या बंद पडलेल्या रुग्णालय भागात नेले. या ठिकाणी दोघांमध्ये पुन्हा दुचाकी दुरुस्तीच्या खर्चावरून वाद झाल्याने ही हत्या झाली. मयूरसह . त्याच्या अन्य साथीदारांनी सचिन सावंत यास लाठ्या-काठ्या व लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. या घटनेत तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात ) दाखल केले असता. त्याचा उपचारा बत दरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान सचिन जखमी अवस्थेत आढळून आल्याने त्यास १०८ अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, शवविच्छेदनात खुनाचा उलगडा झाल्याने मृताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास निरीक्षक विक्रम मोहिते करीत आहेत. दरम्यान, संशयित संशयित मयूर कदम हा घटनेपासून साथीदारासह पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा सर्वत्र शोध घेतला जात आहे.