Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाही, म्हणून तो माझ्याकडे येतो’ नाशिकमधील डॉक्टर आत्महत्याप्रकरणात नवीन ट्विस्ट; नियोजित हत्येचा संशय…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 22 September 2026, 14:58

नाशिक : नाशिक येथील प्रसिद्ध डॉ. मनीषा जेजूरकर यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. डॉ. मनीषा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश जेजूरकर चार दिवसांपासून पोलीस कोठडीत आहेत. त्याच प्रकरणातील दुसरी संशयित आरोपी आणि सिव्हिल रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

डॉ. मनीषा यांच्या बहिणीने दाखल केलेल्या फिर्यादीत डॉ. नीलेश आणि डॉ. स्वाती यांच्यातील कथित विवाहबाह्य संबंध तसेच मानसिक त्रासामुळे मनीषा यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, डॉ. नीलेश यांच्या चार दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत आज (दि. 22) संपत असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

डॉ. मनीषा यांची बहीण रोहिणी वैभव थोरात यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत डॉ. स्वाती चव्हाण यांच्याबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. स्वाती यांनी डॉ. नीलेश यांच्याशी जवळचे संबंध निर्माण केल्याने नीलेश पत्नी मनीषाकडे दुर्लक्ष करू लागले आणि त्यांना मानसिक त्रास देत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दिवाळीच्या काळात मनीषा आई-वडिलांकडे गेल्या असताना त्यांनी पतीकडून त्रास होत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर 14 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी बहिणीला फोन करून पतीचे वागणे बदलले असून ते सतत डॉ. स्वाती यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे.

 

गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या डॉ. नीलेश आणि डॉ. स्वाती यांचे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या घरी येणे-जाणे असल्याचाही दावा करण्यात आला आहे. तसेच जानेवारी 2026 मध्ये मनीषा यांनी घरातील वैयक्तिक गोष्टी पती डॉ. स्वाती यांना सांगत असल्याचे बहिणीला सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मनीषा यांनी स्वाती यांच्याशी फोनवरून याबाबत विचारणा केली असता, त्यांनी मनीषाला पतीला आता तू आवडत नसल्याचे सांगितल्याचा आरोप आहे.

दरम्यान, 9 एप्रिल 2026 रोजी एका महिला डॉक्टरने दिलेल्या अधिकृत जबाबातून नीलेश यांच्या कथित विवाहबाह्य संबंधांबाबत माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच 5 मार्च रोजी एका लग्नसमारंभात डॉ. मनीषा यांचा सार्वजनिकरित्या अपमान झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर 6 मार्च रोजी त्यांनी आत्महत्या केली.

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉ. मनीषा यांनी पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे आणि लग्नसमारंभातील घटनेनंतर हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा संशय असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हे प्रकरण केवळ आत्महत्येस प्रवृत्त करण्यापुरते मर्यादित आहे की त्यामागे आणखी काही बाबी आहेत, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दुष्काळात लावणीचा धुरळा! गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून भाजप नेते वादाच्या भोवऱ्यात,लाखोंची उधळण?

Wednesday, 23 September 2026, 17:45

किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर; युवराज काकडे यांची माहिती

Wednesday, 23 September 2026, 17:38

दिशा सालियन प्रकरणात विनायक राऊतांचा संताप अनावर; वडिलांवर गंभीर आरोप,. ‘मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी……..

Wednesday, 23 September 2026, 17:07

सोरतापवाडी येथील ‘नीलकंठ मोटर्स’ मधून जुनी कार घेतली अन् डेंटिंग-पेंटिंगच्या नावाखाली परस्पर विकली; उरुळी कांचन पोलिसांत एकावर गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 16:44

पेठ येथे विहिरीवरील मोटार सुरू करण्यावरून लोखंडी टाच्याने मारहाण ; चुलते व चुलत भावाविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 16:36

‘आधी मोबदला द्या, मगच मोजणी करा’; लोणी काळभोरच्या शेतकऱ्यांचा महामार्ग भूसंपादनाला विरोध

Wednesday, 23 September 2026, 16:24
Next Post

मंत्रिमंडळाचा मोठा धमाका! 5 महत्त्वाचे निर्णय; दुष्काळ निवारणासाठी सरकार सरसावले, मुंबई मेट्रोबाबतही मोठी घोषणा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp