नेवासा, (अहमदनगर) : माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत भाजीविक्रेत्याने महिलेचा विनयभंग केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. एवढचं नाही तर, आरोपीने हॉटेलवर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना नेवासा शहरात शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पिडीत महिलेने नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अजिज ऊर्फ कालू शेख (रा. गंगानगर, नेवासा खुर्द) आणि अन्य सहा जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जून दुपारी दोन वाजण्याच्या सुमार आरोपी अजिजने दुचाकीवर येऊन पिडीत महिलेला धक्का देत माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच वडील व त्यांच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. आई व बहिणीला जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. एवढंच नाही तर, औदूंवर चौक येथील हॉटेलवर दगडफेक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.