नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यामधून एक दुःखद घटना समोर आली आहे. नदी काठावर शेळ्या चारण्यासाठी गेला असताना नदीत गेलेल्या शेळीला वाचविण्यासाठी मेंढपाळ नदीत उतरला. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शहादा तालुक्यातील अवघे गावालगत घडली आहे. अवघे गावातील मेंढपाळ भावड्या भिल असे घटनेत मृत झालेल्या इसमाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितनुसार, भावड्या भिल हा १४ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी गेला होता. कान्हेरी नदी काठालगत शेळी चारत असताना शेळी पाणी पिण्यास नदीत उतरली. यावेळी पाण्यात डुबकी खात खाली गेल्याचे मेंढपाळच्या लक्षात आले. यानंतर शेळीला बाहेर काढण्यासाठी भावड्या भिल हा नदीत गेला असताना त्याला पाण्याच्या पातळीचा अंदाज आला नाही आणि त्याचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
मातीचा उपसाचा केल्याने नदीत खोल खड्डा..
दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजेपासून प्रकाशा येथील पट्टीचे पोहणारे यूवक नदीत ट्युब टाकत यूवकाचा शोध घेतला. चार तासांचा प्रयत्नानंतर यूवकांचा मृतदेह सापडला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरुन पावसाळ्यापूर्वी रस्ता भराव कामाकरीता जेसीबी लावून नदीतील पिवळी मातीचा उपसा करण्यात आला होता. सुमारे पाचशे मीटर लांबीचा पंचवीस तीस फुट खोल खड्डा झाल्याने नदीला यावर्षी पुर आल्याने मेंढपाळ या नदीचे खोलीकरण अंदाज आला नसल्याने मृत्यू झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.