चांदवड : तालुक्यातील धोडंबे येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची तब्बल १४ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन व्यापाऱ्यांविरुद्ध वडनेरभैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत द्राक्ष उत्पादक शेतकरी बाळकृष्ण सुभाष रकिबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ जानेवारी ते २६ मार्च या कालावधीत व्यापारी चव्हाण (पूर्ण नाव माहित नाही, रा. पुणे) व सूरज भिमराव कांबळे (रा. आपटेवाडी, बदलापूर) यांनी शेतकरी रकिबे यांच्या शेत (गट नं. ३९०) मधील द्राक्षबागेतून एकूण १४ लाख ३६ हजार रुपये किमतीचा १९१.५० क्विंटल द्राक्षमाल खरेदी केला. मात्र, मालाची रक्कम न देता आर्थिक फसवणूक केली. याबाबत पोलिसांनी दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक एस. के. कुशारे अधिक तपास करीत आहेत.