धुळे : साक्री तालुक्यातील लोणखेडी गावाच्या शिवारातील धरणात बुडून शालकासह मेहुण्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघेही दोन दिवसांपासून मोटरसायकलसह बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरु असतांना दोघेही धरणाच्या पाण्यात मृतावस्थेत तरंगतांना आढळून आले. यासंदर्भात, खोरी ता. साक्री, येथील रहिवासी तुकाराम हिंमत शिंदे (४०) हे विक्की भालेराव पाटील (३१ रा. पारोळा जि. जळगाव) यांच्यासोबत मोटरसायकलने ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास खोरी गावाकडे गेले होते.