नाशिक : दिंडोरी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागील भांडणाची कळ काढून महिलेसह अन्य दोघांवर भर रस्त्यात हल्ला करण्यात आला आहे. यामुळे दिंडोरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात वणी पोलीस ठाणेअंतर्गत लखमापूर भागात टोळक्याने मागील भांडणाची कळ बाहेर काढून हॉकी स्टिक आणि दगडाने तीन जणांवर भर रस्त्यात हल्ला केला आहे. 14 जूनला ही घटना घडली असून, सध्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
महिलेसह दोन जण झाले जखमी
या हल्ल्यात वैशाली राजदेव, सतीश भास्कर राजदेव आणि जितेंद्र राजदेव गंभीर जखमी झाले आहेत. सोबत एका गाडीची देखील तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांसमोर मोठे आव्हान
नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन मुलही या गुन्हेगारीत दिसून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रिक्षा चालकाचा खून करण्यात आला. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरत आहे.