नाशिक : नाशिकममधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिकमधील देवळाली गावात एका १५ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थिनीची आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला असून या प्रकरणाला घातपाताची किनार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हायरल व्हिडिओमुळे ही आत्महत्या होती की घातपात असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये काय?
सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दुचाकीवर एक मुलगा आणि एक मुलगी दिसत असून मुलाच्या पाठिमागे बसलेल्या मुलीने त्या दोघांच्या मध्ये बसलेल्या एकाला दोन्ही हातांनी पकडल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा घातपातच असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलीम मंसुरीसह १० आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुटुंबीयांना जिवे मारण्याची दिली होती धमकी..
या घटनेसंदर्भात प्राथमिक माहितीनुसार, मृत विद्यार्थिनीला एक मुलगा नेहमी त्रास देत होता अशी माहिती मिळत आहे. त्याच तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं. विद्यार्थिनी शाळेत जातांना येतांना हा तरुण तिची छेडछाड करत असे. तब्बल दीड ते दोन वर्षांपासून विद्यार्थिनीसोबत हा प्रकार सुरू होता. लग्न कर नाहीतर तुझ्या कुटुंबीयांना जिवे मारेल अशी धमकी हा तरूण मृत तरुणीला देत होता.
जवळपास दोन वर्षापासून सुरू असलेल्या या त्रासाला कंटाळून या विद्यार्थिनीने विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केली. या प्रकरणात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात घातपात केल्याचा संशय येत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.