Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुखी संसाराचं स्वप्न अपूर्ण! मंडप उतरला नव्हता, मेहंदीचा रंगही तसाच होता; माहेरी जातांनाच झाला नववधूचा घात…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 13 July 2026, 21:12

जळगाव: जळगाव शहरात एका नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लग्नाला अवघे सहा दिवस झाले असताना माहेरी जात असलेल्या 21 वर्षीय वैशाली भाऊसाहेब पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली यांचा विवाह 7 जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला होता. लग्नानंतरचे धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर त्या सोमवारी आपल्या काकांसोबत दुचाकीवरून माहेरी निघाल्या होत्या. जळगाव शहरातील कवयित्री बहिणाबाई चौधरी महाराष्ट्र विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात वैशाली यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचे काका रावसाहेब पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच माहेर आणि सासरच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. काही दिवसांपूर्वीच आनंदात लग्न झालेल्या मुलीचा मृतदेह पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.

दरम्यान, अपघातानंतर चारचाकी वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून भरधाव वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यावर ‘बदली’चा धडाका! 4 अधिकारी अन् 11 कर्मचाऱ्यांची उचलबांगडी ; का केली कारवाई?

Saturday, 26 September 2026, 14:20

शिरूर तालुक्यातील आलेगावात एक वर्षापासून ‘मुरूमाची लूट’? पुन्हा पंचनामा झाला, पण उत्खननाचे मोजमापच नाही; महसूल विभागावर प्रश्न

Saturday, 26 September 2026, 13:59

पुण्याचा प्रवास राहिला अधूराच! जालन्यातील लॉजमध्ये आढळला 36 वर्षीय तरुणाचा मृतदेह; नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 26 September 2026, 13:55

पोलीस चौकीजवळच जुगार अड्डा! 6 जणांना पकडलं, 32 हजारांची रोकड जप्त

Saturday, 26 September 2026, 12:37

‘सगळंच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विचारायचं का?’ उदयनराजेंच्या एका वक्तव्याने सातारा जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेत

Saturday, 26 September 2026, 12:27

हडपसरच्या पत्रकारासह 7 हून अधिक जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; बनावट समझोता करार प्रकरण चांगलंच भोवलं

Saturday, 26 September 2026, 12:19
Next Post

वाढदिवसाचा आनंद ओसरण्याआधीच काळाचा घाला; मंचरमध्ये एसटी बस-मोटरसायकलच्या धडकेत १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp