नंदूरबार: लहान मुलांच्या हट्टापुढे कणाचंच काही चालत नाही असे म्हणतात. त्याचा प्रत्यत मुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कृत्यातून समोर आला. धडगावमध्ये पक्षाच्या आदिवासी मेळाव्यासाठी श्रीकांत शिंदे हेलिकॉप्टरने आले होते. कार्यक्रमानंतर परतत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये काही काळ तिथल्या काही विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांची उत्सुकता पाहून श्रीकांत शिंदेंनी चक्क त्यांच्या सोबत एक फेरफटका मारला. त्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यासाठी श्रीकांत शिंदेंनी सोबत असलेल्या 2 मंत्र्यांही हेलिकॉप्टरमधून खाली उतरवलं होतं.
महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबारचा समावेश आहे. आदिवासीबहुल भाग असलेल्या या जिल्ह्यामध्ये शिक्षण, नवे तंत्रज्ञान यांचा तुडवडा आहे. एखादा राजकीय नेता किंवा सेलिब्रिटी हेलिकॉप्टरने तिथे आल्यावर सर्वांना ते पाहण्याची इच्छा निर्माण होते. गुरुवारी धडगावमध्येही असाच प्रकार घडला.
कार्यक्रम आटपून खासदार शिंदे निघाले असता हेलिकॉप्टर पाहण्यासाठी काही मुलांनी त्याच्या आवतीभोवती गर्दी केली होती. ही गर्दी पाहून खासदार शिंदेंनी चक्क आदिवासी मुलांची केवळ हेलिकॉप्टर पाहण्याची नाही तर त्यामधून फेरफटका मारण्याची हौस पूर्ण केली. श्रीकांत शिंदे स्वत: हेलिकॉप्टरमध्ये बसलेले असताना त्यांनी काही स्थानिक मुलांना हेलिकॉप्टरमध्ये बसवून फिरवून आणले.
आभाळाच्या भाळावरती उमटल्या आनंदाच्या रेषा… स्वैर विहरूनी मित्रांसंगे विहंगम न्याहळतो देशा…#DrShrikantEknathShinde #Shivsena pic.twitter.com/LmT3vqIhgi
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) February 22, 2024
दोन्ही मंत्र्यांना उतरवलं
नंदूरबारमधील आपल्या दौऱ्याची सांगता करुन खासदार शिंदे धुळ्याकडे रवाना होण्यासाठी निघाले होते. त्यावेळी शिंदेंना हेलिपॅडजवळ काही लहान मुलं हेलिकॉप्टरकेड फारच उत्सुकतेने पाहताना दिसली. या चिमुकल्यांना फिरवून आणण्याचा विचार श्रीकांत शिंदेंच्या मनात आला आणि त्यांनी तो प्रत्यक्षात अंमलात आणला. खासदार शिंदेंनी त्यांच्याबरोबर आलेले कॅबिनेट मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांना हेलिकॉप्टरमधून उतरवून थोडा वेळ खाली उतरवले. दोन्ही मंत्री अचानक हेलिकॉप्टरमधून उतरवल्याने तिथे उपस्थित असलेल्या इतरांना आश्चर्य वाटले. त्यानंतर काही कळेपर्यंत खासदार शिंदेंनी मुलांसहीत हेलिकॉप्टरने उड्डाण घेतली. काही वेळाने पुन्हा खासदार शिंदेंचं हेलिकॉप्टर याच हेलिपॅडवर उतरलं. पटापट या हेलिकॉप्टरमधून 6 मुलं खाली उतरली. ही मुलं हेलिकॉप्टरमधून खाली उतरल्यानंतर मंत्री भुसे यांनी सर्व मुलांना चॉकलेटचं वाटप केलं. त्यानंतर दोन्ही मंत्री आणि खासदार शिंदेंनी धुळ्याकडे उड्डाण केले.