नाशिक: नाशिक लोकसभेसाठी खासदार श्रीकांत शिंदें यांच्याकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आणायचे आहे, दुसरे कोणाचे नाव नसल्याचे वक्तव्य देखील श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार निवडून आणायचे आहे आणि त्यात गोडसे पण असतील, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
आज मंगळवारी शिवसेनेच्या वतीने नाशिकमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे.