नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहातील मुलींना विषबाधा झाली आहे. संध्याकाळी जेवल्यानंतर विद्यार्थिनींची प्रकृती अचानक बिघडली. जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वसतीगृहातील ७३ पैकी २२ मुलींना जेवल्यानंतर त्रास झाला.
प्रकृती बिघडल्यानंतर विद्यार्थिनींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका विद्यार्थिनीला अधिकच्या उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २१ विद्यार्थिनींचे प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी केली होती. प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील चिचंपाडा येथील आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्री जेवण झाल्यानंतर या वसतीगृहातील जवळपास २२ मुलींना उलट्या आणि मळमळीचा त्रास झाला. यानतंर त्यांना उपचारासाठी विसरवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.