नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच जोरदार तयारी केली आहे. महायुतीकडून नाशिक लोकसभेसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच पुन्हा उमदेवार असतील, अशी घोषणा खासदार श्रीकांत शिंदेंनी मंगळवारी केली. आता या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक लोकसभेबाबत एक घोषणा केली आहे.
नाशिक लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढविणार आहे. तसेच दिंडोरी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) लढविणार असल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच शरद पवार म्हणाले की, लोकांचा कल महाविकास आघाडीला अनुकूल आहे. शेतकऱ्यांची सत्ताधारी लोकांवर नाराजी दिसत आहे. धुळे, नाशिक, सातारा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. ऊस महत्वाचे पीक आहे. त्यापासून इथेनॉल आणि इतर तयार गोष्टी होतात. केंद्राची धरसोड वृत्ती असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. शेतकरी अस्वस्थ आहेत तर बेरोजगारी महागाईमुळे सर्वसामान्य अस्वस्थ आहेत. याची किंमत सत्ताधारी पक्षाला मोज्वाई लागेल असंही शरद पवार म्हणाले.