धुळे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यावरून आता श्रेयवादाच्या लढाईला सुरवात झाली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत असं विधान भाजप नेते नितेश राणे यांनी केलं होतं. यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदर संजय राऊत यांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचे दिसून आले आहे. यावरून आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. याबाबत संजय राऊत यांना विचारलं तेव्हा नितेश राणे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना त्यांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचे दिसून आले. ‘चु…. आहे तो’ असं बोलत संजय राऊत उठून निघून गेले. मात्र त्यावर बोलणं त्यांनी टाळलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला सुरवात होण्याची शक्यता आहे.
श्रेयवादाचे युद्ध..
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. याची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण आहे. मात्र, आता यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असून श्रेयवादाचे युद्ध रंगू लागले आहे.