जळगाव : वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. नशिराबाद ते तरसोद दरम्यान वाळूमाफियांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून हल्लेखोरांनी अधिकाऱ्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान केले आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णलायत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांच्याकडून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर अडविण्यात आले होते. नशिराबाद गावाच्या पुढे ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई रात्री उशीरा करण्यात आल्याने सगळीकडे अंधार होता. त्यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार विजय बनसोडे व चालक होते. तहसीलदार बनसोडे हे वाळू ने भरलसेला डंपर पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना, अचानक दुचाकी चारचाकीवरून त्यांनी थेट लोखंडी पाईपच्या साहाय्याने सोपान कासार आणि वाहनावर हल्ला केला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
धुळ्यातही तहसीलदारांना मारहाण
वाळूची अवैध वाहतूक करताना करण्यात आलेल्या कारवाईत शिरपूर येथील तहसीलदारांना शिवीगळ करीत धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेत तिघांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.