जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच आता त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र वेगळी भूमिका घेतल्याचं दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण भाजपमध्ये जाणार नाही, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असल्याचं रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे मी पार पाडणार आहे, असंही रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून माहिती दिली आहे.
तसेच लवकरच राज्यात महिला मेळाव्यांचे आयोजन करत झंजावती दौरा करणार असल्याचं रोहिणी खडसे यांनी सांगितलं आहे. लोकसभा मतदारसंघात सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी महिलांची सक्षम ताकद उमेदवारांच्या पाठीमागे उभी करणार असल्याची भूमिका रोहिणी खडसे यांनी घेतली आहे.
राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहेत. येत्या 9 किंवा 10 एप्रिल रोजी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता रोहिणी खडसे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, रोहिणी खडसे यांनी स्वतः त्यावर स्पष्टीकरण दिलं असून आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे.
मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच …
लढ़ेंगे और जीतेंगे ✊✊
@NCPspeaks pic.twitter.com/XqHrrnJFol— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) April 6, 2024