नाशिक : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस स्टेशनमध्येच पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अशोक नजन, असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अशोक नजन हे अंबड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. अशोक नजन यांनी स्वतःवर गोळी झाडल्यानंतर ते जागीच गतप्राण झाले. या घटनेमुळे नाशिकच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षभरापासून अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून अशोक नजन काम करत होते.
अतिशय शांत व सोज्वळ स्वभावाचे असलेले नजन यांनी आपल्या कामातून वचक निर्माण केला होता. आज सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ते त्यांच्या कॅबिनमध्ये बसलेले होते. तेव्हा त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. आत्महत्येच कारण मात्र अद्यापपर्यंत समजलेलं नाही.