नाशिक: राम मंदिर बनवून मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याशिवाय राम मंदिरात भगवान राम यांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापणा अगोदर पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा शुभ संकेत असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली. जगात सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणून मोदी यांचा उल्लेख करण्यात येतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मोदी लक्षद्वीपला गेले, मालदीवला भूकंप
मोदी आहे तर मुमकीन आहे. मोदी लक्षद्वीपला गेले तर मालदीवला भूकंप आला. जगात मोदींचे नाव आदराने घेतले जाते. मोदींना कोणी बॉस म्हणते तर मोदींसोबत कोणी सेल्फी काढते. मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाव पोहचली आहे. मोदी देशभक्त राष्ट्रभत नेता आहेत. प्रधानमंत्री झाले हे भाग्यच. भारत जगातील सर्वाधिक युवकांचा देश आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते. सकाळी 10.30 वाजता त्याचे निलगिरी बाग येथे त्यांचे आगमन झाले. नाशिकमध्ये मोदींचा भव्य रोड शो झाला. यावेळी हजारो नाशिककरांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते जलपूजन आणि गोदावरीची आरती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरोहित संघाच्यावतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन स्वागत करण्यात आले. रामकुंड परिसराला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात दर्शन घेतले. काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात मुख्य दरवाजाने दाखल झाले. येवल्याच्या पैठणीचा शेला देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.