जळगाव : अजित पवार यांना त्यांच्या पक्षातून बंडाचा इशारा देण्यात आला आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तरुण कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडतील असा इशारा प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तरुण कार्यकर्ते तसेच पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. एवढेच नव्हे तर अजित पवार यांच्याविरुद्ध बंड पुकारण्याचा इशाराही तरुणांनी दिला आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेवर उमेदवारी न दिल्यास हजारो युवक पक्षातून बाहेर पडतील, असा थेट इशारा देणारे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी केले आहे. अजित पवार यांच्या विरोधातील या बंडाच्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
महायुतीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने आपआपले उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु अजित पवार यांच्या गटातून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. छगन भुजबळ यांच्याकडून ओबीसी समाजाला राज्यसभेची उमेदवारी देण्याची मागणी होत आहे.
राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ दादा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्या अन्यथा हजारो युवक बाहेर पडतील असा थेट इशारा पक्षश्रेष्ठींना पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांनी दिला@AjitPawarSpeaks @SunilTatkare @praful_patel @parthajitpawar pic.twitter.com/PGaz6z4S23
— Ncp Ravindra Nana Patil (@NcpRavindraNana) February 14, 2024