मनमाड : राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. एकामागून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. अशीच एक घटना मनमाडमडूहन समोर येत आहे. 19 वर्षीय तरुणाने साडेतीन वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याने मनमाडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहीत अशी कि, नाशिकच्या मनमाडमध्ये भाडोत्री राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणाने घरमालकाच्या साडेतीन वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मनमाडच्या शांतीनगर भागात हा संतापजनक प्रकार घडला आहे.
19 वर्षीय तरुणाला अटक..
पिडीत मुलाच्या वडिलांनी या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. दरम्यान, लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित हर्षल भालेराव या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास मनमाड पोलीस करत आहे.