अहमदनगर : घरातून मांजा विक्री केल्यामुळे अहमदनगरमधून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे. जीवघेण्या मांजामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. यात मुले, पशु-पक्षी, वाहन धारक, पादचारी आदी गंभीररित्या जखमी होतात. त्यामुळे मांजा विक्री आणि खरेदीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र त्याला लोकांकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे.
गुप्तहेराकडून माहिती
सुमित लोढा व शुभम फुलसौंदर (दोघेही रा.नगर) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी २६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. कोतवाली पोलिसांना गुप्तहेराकडून बातमी माहिती मिळाली होती, एक इसम त्याच्या राहत्या घरातून चायना नायलॉन मांजाची विक्री करत आहे. आता कारवाई केल्यास तो सापडेल. ही माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ छापा टाकून कारवाईचे आदेश दिले आणि धाड टाकली.
२६ हजारांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत आरोपी सुमित लोढा याच्याकडून ७ हजार ५०० रु. किमतीचे १५ विविध रंगाचे लायलॉन बंडल, ७ हजार रु. किमतीचे ७ नायलॉन मांजा गुंडाळालेले चक्री आणि ३ हजार रु. किमतीची मांजा गुंडाळण्यासाठी वापरण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटार असा एकूण १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शुभम फुलसौंदर याच्याकडून ४ हजार ६००रु. किमतीचे मांजा असलेले सात बंडल व मांजा गुंडाळण्यासाठी असलेली ४ हजार किमतीची इलेक्ट्रिक मोटार असा एकूण ८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस अंमलदार तन्वीर शेख योगेश भिंगारदिवे, अविनाश वाकचौरे, ए पी इनामदार, शाहीद शेख, रवींद्र टकले सलीम शेख, अमोल गाढे, संदिप थोरात, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, प्रमोद लहारे प्रशांत लोळगे म.पो.हे, कल्पना आरवडे, परमासागर यांच्या पथकाने केली आहे.