Nashik Crime: नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने आपल्या मैत्रिणीशी समलैंगिक विवाह केला. त्यानंतर या विवाहाला लपवून नाशिकमधील एका तरुणाशी दुसरा विवाह करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या तरुणीसह तिच्या आई-वडिलांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सामनगाव रोड, सिन्नर फाटा येथील रहिवासी तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादिनुसार काही दिवसांपूर्वी एका तरुणीशी त्याने विवाह केला होता. मात्र, या तरुणी त्याच्याशी व्यवस्थित वागत नव्हती. तिला स्पर्श केला असता विचित्र वागायची आणि तरुणाला आत्म्याहत्या करीन अशी धमकी द्यायची. असं फिर्यादीत नमूद केलं आहे.
लग्नानंतर ही तरुणी नेहमी कोणाशीतरी फोनवर व्हिडिओ कॉल करीत असे, बोलत अन् चॅटिंग करीत बसायची. एकदा परीक्षेच्या वेळेला माहेरी गेल्यानंतर तिने लग्नात दिलेले तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठणही हरवले असं तरुणाला सांगितलं, असं तरुणाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.
एकदा तरुणी माहेरून परत आली तेंव्हा तरुणाने तिचा मोबाइल तपासला असता त्याला तरुणीच्या समलैंगिक विवाहाबाबत कळालंन. या प्रकारचा त्याला जबर धक्का बसला. त्यानंतर मुलीच्या वडिलांना आमची फसवणूक का केली अशी विचारणा केली असता त्यांनी तरुणालाच शिवीगाळ करायला सुरुवात केली. असं फिर्यादीत म्हटल आहे.
पुण्यात मैत्रिणीसोबत समलैंगिक विवाह केल्याची धक्कादायक माहिती तरुणाला तेंव्हा कळाली जेंव्हा त्याने तिचा मोबाईल पहिला. त्या मोबाईलमध्ये तरुणीने मैत्रिणीसोबत केलेले व्हिडीओ कॉल, एकमेकींचे शारीरिक संबंधांचे व्हिडीओ, अश्लील संदेश, तरुणीने पतीला दिलेली धमकी हे सर्व पती तरुणाने पाहिलं त्याला धक्काच बसला. त्यानंतर पिडीत तरुणाने थेट पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली.
दरम्यान, आपल्याला हा विवाह करायचं नव्हता, आपण समलैंगिक असून मी विवाह केल्याचे आणि पुरुषांमध्ये तिला काहीही आकर्षण नसल्याचं आई-वडिलांना सांगितलं होतं. असं तिने म्हटलं आहे. हे लग्न होऊ नये म्हणून घर सोडून गेल्याचं आणि गोळ्या खाल्ल्याचं तीनं म्हटलं आहे.
यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार मोरे करीत आहेत.






