नाशिक : इंदिरानगर परिसरामध्ये रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने संशयिताने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पोबारा केला. जया काटे या दसककडे जाणाऱ्या मार्गावर पायी जात असताना, एक कार त्यांच्याजवळ येऊन थांबली. बोलत असताना त्यांच्या गळ्यातील ७५ हजारांची सोन्याची पोत चोरून नेली.
एरवी चोरटे दुचाकीवरून सोन्याची चैन खेचायचे. परंतू या घटनेत संशयितांनी कारचा वापरली होती. कारमधील अज्ञात संशयिताने त्यांच्याकडे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना थांबविले. पत्ता विचारण्यात गुंतवून ठेवत कारमधील संशयिताने संधी साधत त्यांच्या गळ्यातील ७५ हजारांची सोन्याची पोत बळजबरीने खेचून कारमधून नाशिकरोडच्या दिशेने पोबारा केला.
शनिवारी (ता. २७) रात्री देखील एका पाठोपाठ दोन सोनसाखळी खेचल्याच्या घटना घडल्या. असा एकून चोरट्यांनी दिवसांत लाखोंचा ऐवज लंपास केला. त्यामुळे सध्या तिथे चिंतेचे वातावरण आहे. नाशिकरोड पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.