नाशिक : ‘मी ठरवलं तर डायरेक्ट कार्यक्रम करतो. आता एक माईक जुना झाला म्हणून दुसरा हातात घेतला. तो जुना सारखा सारखा बिघडतो. मी नवा माईक हातात घेतला, यातून लोकांच्या न्यायाचा आवाज येतो, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील आज येवला तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
येवला तालुक्यात सांत्वनपर भेट आहे. आता रस्त्यात गाव आहे. ते बाजूला सारू का? कोणाला पाडा हे सांगायला मी येथे आलो नाही. मात्र, मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला पाडा. आता कोणी पडत असेल तर त्यामध्ये माझा काय दोष? एकदा जर लोकांनी ठरवलं, येवला पवित्र करायचं तर काही अडचण आहे का? माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं काही नाही. तुम्हाला ज्याला पाडायचं, त्याला पाडा. ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. पण, मराठा आरक्षण डोळ्यासमोर ठेवा’, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, मराठ्यांची गरजच नाही, असं म्हणण्यापेक्षा छोट्या छोट्या उद्योगपतींची देखील गरज नाही. मोठेच उद्योगपती लागतात. त्यांचा संदेश बरोबर आहे. कारण सरकार पाडायला आता गरीब एक झाले आहेत. मत वाया जाऊ देऊ नका. ज्याला पडायचं, त्याला पाडा हे मी सांगितलं आहे. मी कोणाचं नाव घेतलं नाही. आमचं विधानसभेला समीकरण कुणाशी जुळलं नाही हे दोन्ही सारखेच आहेत, असंही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
प्रचाराला कुणीही येईल म्हणून आपल्या सोबत आहे, असं नाही. काही व्यासपीठावर पडून देखील रपारप पाडतील. लोक तिकडे दिसले तरी शेवटी जात खूप महत्त्वाची आहे. शेवटी मतदान करताना त्याच्या समोर त्याची लेकरं आलीच पाहिजेत. कोणी बरोबर असल्याने काही मते पडत नाहीत. त्यांच्या बरोबर असून देखील कार्यक्रम होतो, अशी ठीक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली.