नाशिक : केवायसी करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एकास पावणे चार लाख रुपयांना गंडा घातला आहे. लिंक ओपन करण्यास भाग पाडून एका व्यक्तीच्या दोन क्रेडिट कार्डवरून या रकमा ऑनलाइन पद्धतीने वळविण्यात आल्या असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत शिवाजी रौंदळ यांच्याशी गेल्या बुधवारी (दि. १४) भामट्यांनी संपर्क साधला होता. ९१९३६१४२०००७ व ९१९८३२५३६४१९ या क्रमांकाच्या मोबाईलधारकाने आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगत, ऑफर असल्याची बतावणी केली. रौंदळ यांना लिंक पाठवून त्यात गोपनीय माहिती भरण्यास भाग पाडले. डाउनलोड केलेल्या अॅपमधील कस्टमर सपोर्ट या ऑप्शनवर रौंदळ यांनी क्लिक केले असता, त्यांच्या एसबीआय आणि आरबीएल क्रेडिट कार्डवरून सुमारे तीन लाख ८५ हजार २४४ रुपयांची रक्कम लांबविली.